Events

श्री दत्त शेत.सह.सा.कारखाना चरिटेबल ट्रस्ट दत्तनगर शिरोळ संचलित श्री दत्त पॉलीटेक्निकच्या वतीने शुक्रवार दिनांक 30 रोजी 'सदभावना व सामाजिक ऐक्य दौड' आयोजित करण्यात आली होती.'सामाजिक ऐक्य पंधरवडा ' या अंतर्गत सदर दौडीचे आयोजन कण्यात आले होते.सदर दौडीस सर्व विद्यार्थी वर्ग सर्व विभागप्रमुख आणि स्टाफ तसेच नॉन-टीचिंग स्टाफ उपस्थित होता. सकाळी ठीक ८ वा. वाजता कोलेज कार्यस्थळावरून सर्व विद्यार्थ्याना सद्भावना दिवसाची व सामाजिक ऐक्याची प्रतीज्ञा दिल्यानंतर श्री दत्त शेत.सह.सा.कारखाना चरिटेबल ट्रस्टचे एक्स ओफ़िसिओ ट्रस्टी श्री.एम.व्ही.पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या दौडीस सुरुवात झाली.या 'सदभावना व सामाजिक ऐक्य दौड' चा उद्देश सर्व विद्यार्थीवर्गात विद्यार्थीदशेपासूनच शारीरिक दृष्ट्या निरोगी राहण्याची भावना आणि समाजातील सर्वच थरातील सर्व वर्गाच्या सर्व धर्माच्या व सर्व भाषिक लोकांच्या मध्ये बंधुत्वाची अन सलोख्याची भावना वाढीस लागावी तसेच गुन्हेगारी वृत्तीचा दहशतवादी वृत्तीचा सरळ नायनाट करणे यासाठी समाज प्रबोधन करणे हा आहे.असे यावेळी बोलताना ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा.व्ही.जी.हिंगमीरे यांनी सांगितले. सदर दौड कोलेज पासून तहसीलदार कार्यालयावरून शिवाजी चौक शिरोळ ते परत श्री दत्त पॉलीटेक्निक कोलेज अशी झाली. सदर दौडीदरम्यान शिरोळ पोलिस स्टेशनकडील वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले होते तसेच श्री दत्त आरोग्य केंद्राकडून अब्युलन्सचे व्यवस्था करण्यात आली होती.श्री दत्त पॉलीटेक्निक कोलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी यात घोषणा देत उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता.शेवटी सर्व विद्यार्थ्याना कॉलेजच्या वतीने चहापान देवून कॉलेज कार्यस्थळावर या दौडीचा समारोप करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादा काळे,प्राचार्य श्री आर.एस.चौगुले, रजीस्टार श्री. बी.एन.चौगुले. सर्व विभाग प्रमुख व सर्व स्टाफ उपस्थित होता.